इतर

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत साईसेवा मतिमंद विद्यालयाचे यश


अहिल्यानगर -दिनांक २७ व २८ जानेवारी २०२५ रोजी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्पेशल ऑलिंपिक्स भारत महाराष्ट्र, अहिल्यानगर तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद व समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग (प्राथमिक) अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४- २०२५ विळद घाट येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये साईसेवा मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला व विशेष प्राविण्य मिळविले.
याप्रसंगी मा. डॉ श्रीमती मेघा किरीट सोमैया -अध्यक्ष स्पेशल ऑलम्पिक्स भारत महाराष्ट्र, मा. श्री सिद्धरामजी शालीमठ-जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी अहिल्यानगर, मा.श्री देविदासजी कोकाटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, मा.श्री आमसिद्धजी सोलनकर -जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर, मा. सौ.धनश्रीताई विखे पाटील -अध्यक्ष स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र अहिल्यानगर तसेच उपाध्यक्ष डॉ. अभिजीत दिवटे, मा.श्री आशिषजी येरेकर -मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, मा.श्री प्रवीण कोरगंटीवार -मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर असे मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेत ५० मीटर धावणे (वयोगट ५ ते ७ वर्षे) या स्पर्धेत कुमारी ईश्वरी अमोल डूबे-प्रथम क्रमांक, कु. सिद्धेश्वर मनोज शिरसाठ -द्वितीय क्रमांक (वयोगट ८ ते १२) मिळविला, १०० मीटर धावणे ईशांत अशोक होन -तृतीय क्रमांक (वयोगट १७ ते २१), २०० मीटर धावणे कु. साहिल गणेश बोधक-तृतीय क्रमांक (वयोगट १७ ते २१), ४०० मीटर धावणे (वयोगट १७ ते २१) कु. इशांत अशोक होन-द्वितीय क्रमांक, स्पॉट जम्प (जागेवरून लांब उडी) (वयोगट ५ ते ७) कुमारी ईश्वरी अमोल डूबे-प्रथम क्रमांक व सॉफ्टबॉल थ्रो (वयोगट ८ ते १२) कुमार सिद्धेश्वर मनोज शिरसाठ द्वितीय क्रमांक मिळविले.
रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात साईसेवा मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली व हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रम झाल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम, विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर, श्री दिपक कोकणे सर, श्री ओमप्रकाश खताळ सर, श्री बालाजी हनमंते सर, विशेष शिक्षिका श्रीमती नंदा शेळके मॅडम, श्रीमती स्वाती शेळके मॅडम, मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम, कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर, परिचारिका श्रीमती सुनंदा सुर्यवंशी मॅडम, तसेच सहकारी कर्मचारी श्री शंकर सोनवणे, श्री सचिन भोर, श्री सुरेश वलवे, श्री संकेत जगधने, श्रीमती मेघा हासे,श्रीमती मथुरा जाधव व श्री गोवर्धन खांडेकर यांचे सहकार्य लाभले.अहिल्यानगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button