श्री ढोकेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड , डॉ. खिलारी यांनी केले कौतुक!

दत्ता ठुबे
पारनेर :-श्री ढोकेश्वर महाविद्यालयातील चार विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली आहे महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ.भाऊसाहेब खिलारी यांनी केले.
महाविद्यालयाच्या वतीने डॉ.खिलारी यांच्या शुभहस्ते पोलीस दलात भरती झालेल्या आचल गायकवाड, सुचिता उंडे , तृषाली राऊत ,सायली वाळुंज आणि सचिन मोरे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी डॉ.खिलारी पुढे म्हणाले की महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रथम शाळा सुरू केल्या याचाच परिणाम म्हणून शिक्षण व इतर सर्व क्षेत्रात मुली आज उच्च पदावर कार्यरत आहेत. मुलींप्रमाणेच मुलांनीही शिक्षण घेऊन अधिकारी बनावे असे आवाहनही त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनीही पोलीस दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आणि श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोलिस दलात मारलेली भरारी ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अशाच प्रकारची प्रगती करून महाविद्यालयाचे, कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्वल करावे असे ही आवाहन प्राचार्य यांनी केले.
पोलीस दलात भरती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव श्री जयंत वाघ, खजिनदार एड. दिपलक्ष्मी म्हसे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.विरेंद्र धनशेट्टी यांनी केले तर आभार प्रा.लक्ष्मण कोठावळे यांनी मानले.