छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त…ए.आर. बुर्ला वरिष्ठ महाविद्यालयात CPR चे प्रशिक्षण!

सोलापूर – आपल्या जवळच्या व्यक्तीस अचानकपणे Cardiac Arrest (ह्रदयक्रिया बंद पडणे) अशा अत्यंत महत्वाच्या वेळी माणसाला काहीही सुचत नाही. किंवा काय करावे कळत नाही. यासाठी CPR (कॉर्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन) देणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे माणूस जीवंत होण्यास कारणीभूत ठरेल. रिक्षा, कार अँब्यूलन्स आदी वाहने येण्यासाठी किमान 5 मिनिटे लागतील. या 5 मिनीटाच्या आधी CPR देणे फार आवश्यक आहे. यानंतर लगेचच हॉस्पिटल मध्ये ॲडमीट करावे.
गेल्या ५ – १० वर्षांपासून अनेकांच्या हृदयविकाराच्या अडचणीत वाढ झाले आहे. लहान मुलांपासून ते वयाच्या ५५ वर्षांच्या माणसाला ह्रदयविकार होत आहे. पूर्वी वयाच्या ६० वर्षांच्या पुढील माणसांना ह्रदयविकार वायचे. आता सर्रासपणे सर्वांनाच होत आहे. जीवनशैली, जंकफूड व अवेळी खाणे – पिणे यामुळे मानवी जीवनास आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जीवास मुकावे लागत आहे.
डॉ. प्रशांत पांडे (मुंबई, लाइफसपोर्टर्स इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस) यांच्या मार्गदर्शनाखाली CPR चे प्राथमिक प्रशिक्षण शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता राजेंद्र चौकातील ए.आर. बुर्ला वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन केले आहे. यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, ए. आर. बुर्ला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक एक्कलदेवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाविद्यालयात CPR चे प्रशिक्षणाचे माहिती घेण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केले आहे