अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी जपून ठेवा-जाईबाई ठोकळ

राजूर/प्रतिनिधी
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी जपून ठेवा .शून्यातून शाळा सुरू होऊन आज या ज्ञानमंदिराने गरुड झेप घेतली आहे . या विद्यालयात शिकून पुढील शिक्षणासाठी तुम्ही शाळेचा निरोप घेऊन वाटचाल करणार आहात असे प्रतिपादन जि प माजी सदस्या जाईबाई ठोकळ यांनी राजूर येथील श्री समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय ठिकाणी इयत्ता दहावीच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रतिपादन केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माधवराव गभाले , प्रमुख अतिथी संकेत येलमामे,संस्थेचे सचिव शांताराम काळे ,वर्षाताई शेलार ,प्रेमानंद पवार, प्रा. विनोद येलमामे माजी मुख्याध्यापक विलास महाले ,प्रशांत देशमुख उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संकेत येलमामे यांनी लहानपणापासून आयुष्यात काय बनायचे त्याचे ध्येय ठेवा .दहावीनंतर आर्ट कॉमर्स सायन्स या शाखांमध्ये जा .जे आवडते ते करा .परीक्षेत पेपर लिहिताना तीन तासाचे नियोजन करा .कॉपी करू नका .कॉपी करणारा मुलगा कधी पुढे जाऊ शकत नाही .कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अगोदर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत महत्त्वाची आहे यासाठी प्रामाणिकपणे नियोजनपूर्वक अभ्यास करा . नाही असे सांगितले .

दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव गभाले गुरुजी यांनी पूर्वी चौथी सातवीला केंद्र परीक्षा होती . आज दहावीला बोर्ड परीक्षा आहे . पुस्तक हातात घेतल्याने अभ्यास होत नाही .
तसेच या कार्यक्रमासाठी बीएडच्या प्रशिक्षणार्थी ऋतुजा भांगरे ,निकिता भांगरे ,पूजा बांडे, ज्योती डगळे या उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले तर सूत्रसंचालन सारिका करपे व विनायक साळवे यांनी केले शेवटी आभार सतीश काळे यांनी मानले ..