22 फेब्रुवारी ला पुण्यात राज्यस्तरीय युवा कामगार संमेलन

:पुणे – भारतीय मजदूर संघाला 70 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यातील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कामगार युवा संमेलन. युवाशक्ती हे भारताचे वर्तमान व भविष्य आहे.विविध उद्योगांत युवा कामगार मोठ्या संख्येने कार्यारत आहेत. अनेक उद्योगांतील युवक कामगारांच्या समोर रोजगार सुरक्षा, वेतन सुरक्षा, व सामाजिक सुरक्षा ही मोठी आव्हाने आहेत, युवा कामगारां समोरील आव्हाने आणि विकसित भारतात कामगारांचे स्थान या विषयावर भारतीय मजदूर संघातर्फे राज्यस्तरावर हे युवा संमेलन शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत शिवशंकर सभागृह, 95 कौस्तुभ जहाजले पथ, मुकुंद नगर पुणे येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री मा.ना.ऍड.आकाशजी फुंडकर यांच्या हस्ते होणार असून भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढूमणे, महामंत्री किरण मिलगीर, क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश , प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, प्रदेश पदाधिकारी श्रीमती वंदना कामठे, श्रीमती शर्मिला पाटील, हरी चव्हाण, विशाल मोहिते उपस्थित राहणार आहेत. या संमेलना करिता तयारी व्यवस्था करिता पुणे जिल्हा पदाधिकारी, कार्यकारिणीव्दारे संमेलनाची तयारी चे काम चालू आहे , या संमेलनात महाराष्ट्र प्रदेशातील औद्योगिक, संरक्षण, वीज, रेल्वे, बॅंक, सहकारी बॅंक, वीमा उद्योग, बीएसएनएल, खाजगी मोबाईल प्रकल्पातील कामगार, पोस्ट, जल प्राधिकरण, परिवहन, हाॅटेल, बिडी, घरेलु , बांधकाम कामगार, अंगणवाडी, मध्यान्ह भोजन, ईतर उद्योगातील कामगार सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व सेक्रेटरी सागर पवार यांनी सांगितले आहे.
या संमेलनात जास्तीतजास्त कामगारांनी विविध ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात व अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे यांनी केले आहे.