महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार!

भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा अधिवेशन संपन्न

पुणे दि २०

भारतीय मजदूर संघ संघाचे पुणे जिल्हा अधिवेशन दि 19/02/2022 रोजी विश्वकर्मा भवन पुणे येथे प्राधिधिनीक स्वरूपात संपन्न झाले . या अधिवेशनात असंघटित कामगार, विविध ऊद्योगातील कंत्राटी कामगार यांना रोजगारात सुरक्षितता, जिवन वेतन , भविष्य निर्वाह निधी, ई स आय, व पेंशन ई बाबी लागु करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास भारतीय मजदूर संघ रस्ता वर उतरून त्रिव आंदोलन करण्याचा इशारा भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे यांनी दिला आहे.
सदर अधिवेशन चे उद्घाटन श्री मोहन येणूरे प्रदेश सरचिटणीस, श्रीपाद कुटासकर संघटनमंत्री, सौ अश्विनी देव ,जालिंदर कांबळे प्रदेश उपाध्यक्ष, हरि सोवनी अध्यक्ष पुणे जिल्हा, अजेंद्र जोशी यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.
कार्यक्रम चे प्रास्ताविक व गेल्या दोन वर्षांतील कामकाज चा आढावा व ठळक घडामोडी चा वृतांत श्री बाळासाहेब भुजबळ यांनी नमूद केला, या मध्ये कोव्हीड लाॅकडाऊन मध्ये विविध प्रांतातील कामगारांना धान्य वाटप, त्यांच्या मुळ राज्यात परत पाठविण्यात करण्यात आलेली मदत कार्य, रोजगार रक्षणासाठी केलेला संघर्ष, विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांची आंदोलन, विविध विषयांवर आलेल्या समस्या चे सोडविण्यासाठी केलले प्रयत्नांचे निवेदन करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारी ऊद्योगातील खाजगी करण, संरक्षण ऊद्योगातील कंपनीकरण, बॅंकेचे विलीणी करण , होवु घातलेला विधेयकास विरोध करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणार्या मोर्चा बाबतीत ची माहिती बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विलास टिकेकर यांनी दिले. कामगार कायद्यातील बदल व सामाजिक सुरक्षा या मुळे ऊद्योग व कामगार क्षेत्रातील आव्हान, परिणाम या बाबतीची माहिती अॅड राजेश शाळिग्राम यांनी दिली. व उपस्थितांचे शंका समाधान केले.


या वेळी अधिवेशनात नवीन कार्यकारिणी ची घोषणा संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर यांनी केली.
भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ , कार्याध्यक्ष अभय वर्तक बॅंक, अजेंद्र जोशी, बॅंक, संघटन मंत्री श्री हरी सोवनी सहसंघटन मंत्री उमेश विस्वाद, कार्यालय व्यवस्था प्रमुख विवेक ठकार.
जिल्हा उपाध्यक्ष- प्रवीण निगडे राज्य सरकारी कर्मचारी, बाळासाहेब पाटील महिंद्रा सी आय ई, अण्णा महाजन सेंचुरी ऐन्का, सुरेश जाधव महावितरण, उमेश आणेराव, विज कंत्राटी, बाळासाहेब वरपे खाजगी ऊद्योग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर सहसचिव म्हणून श्री ज्ञानेश्वर पाटील अॅम्युनेशन खडकी , विजयेंद्र सावंत ईस्पेस हाय वे, विजय बुधकर शैक्षणिक, बालाजी ढेरंगे पोस्ट, दत्तात्रय जाधव गोदरेज अॅड बाॅईज, संतोष शितोळे कारगील इंडिया कुरकंभ, विजय चव्हाण बांधकाम कामगार संघ , राहूल बोडके विज कंत्राटी, यांची पुणे जिल्हा सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. सौ वंदना कामठे टेलीफोन, व सौ भागश्री बोरकर यांची महिला विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली.


या वेळी जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून सचिन मेंगाळे व सहप्रसिध्दी प्रमुख श्री गणेश टिंगरे यांची निवड करण्यात आली. या वेळी सचिन मेंगाळे यांची अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघा (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नुकतीच निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला
अधिवेशनात पुणे जिल्हातील बॅंक , L I C , संरक्षण, पोस्ट, विज ऊद्योग ,महानगरपालिका, कॅटोंमेंट , बांधकाम कामगार, घरेलु कामगार, विज कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलु कामगार, रिक्षा चालक , शैक्षणिक संस्था, ई उद्योगातील कामगार प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button