डॉ. एस. के. सोमण यांना राज्यस्तरीय कोहिनूर रत्न पुरस्कार जाहीर!

अकोले प्रतिनिधी
तब्बल 50 वर्षापेक्षा अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत कोतुळ (ता अकोले) येथील डॉ सुभाष केशव सोमण यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे रविवार २३ फेब्रुवारी रोजी नाशिक नगरीत मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे
नाशिक येथील गुरू आराध्या फाउंडेशनच्या संस्थापक भागवताचार्य हभप अर्चनाताई आहेर गणोरेकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहे डॉ एस के सोमण गेल्या 50 वर्षापासून आदिवासी ग्रामीण भागात अत्यल्प दरात आरोग्य सेवेचे काम करत आहे हजारो रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवले असून हजारो त्यांनी एम बी बी एस पदवी घेऊन शहरी भागात मोठे हॉस्पिटल न थाटता आदिवासी , ग्रामीण भागातील गोरीगरीब जनतेचे सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतले त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील या सेवाभावी कामाची दखल घेऊन त्यांना “महाराष्ट्र कोहिनूर रत्न” हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
व्यक्तीं व संस्थांचा दरवर्षी गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते
या वर्षीच्या कोहिनूर रत्न राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक नगरीत नाईस संकुल, आय. टी. आय. सिग्नल जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड , आमदार सौ सिमाताई हिरे, नासिक पश्चिम, दिनकर अण्णा पाटील सभागृह नेते नाशिक, डॉ सिताराम कोल्हे कमिशन
ऑफिसर ( ) नाशिक, समाधान भाऊ देवरे सातपूर, रायगड प्रतिष्ठान, ह भ प राहुल महाराज साळुंखे विश्वस्त श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर संस्थान त्रंबकेश्वर, भूषण भास्कर पगार उद्योजक रेणुका इंडस्ट्रीज कळवण, सचिन गुंजाळ संगमनेर नायब सुभेदार आदींच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
एस के सोमण यांना गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने
राज्यस्तरीय कोहिनूर रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊनअभिनंदन केले आहे.