अकोले आदिवासी तालुक्यातील आदिवासी बालकांचे कुपोषणा मुख्यमंत्र्याना निवेदन
अकोले (प्रतिनिधी) अकोले आदिवासी तालुक्यातील बालकांचे कुपोषण वाढत असल्याबाबत…. व बालकांच्या दुर्धर आजाराबाबत अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी राज्यपाल- मा.सी.पी राधाकृष्णन,व मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणविस. इमेल व पत्राद्वारे निवेदन दिले असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे मच्छींद्र मंडलीक, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रूदे यांनी दिली आहे.
निवेदनात अकोले आदिवासी तालुक्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोले व बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुर असे एकूण दोन प्रकल्प कार्यालय असून त्यांच्या अंतर्गत २० ते २५ सुपर वायझर (पर्यवेक्षिका) ५८७ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे. तेवढेच अंगणवाडी सेविका मदतनीस, असून त्यांच्या अंतर्गत अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना व कुपोषित बालकांना आणि दुर्धर बालकांना व गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, नाचणी सत्त्व व ईडीएनएफ हा बालकाच्या वजनाच्या प्रमाणे आहार दिला जातो. मल्टीमिलेट बिस्किट, पोषक कल्पवडी, देण्यात येते पूरक पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी फळ यासारखे पौष्टिक खाद्य इत्यादी पुरविले जातात.
तसेच या वर शासनाचा लाखो व कोटी रुपयांचा खर्च होत असून यात आपन लक्ष घालून बालकांचे कुपोषण व बालकांना दुर्धर आजार व इतर आजारापासून सुटका होईल व त्यांना वेळो वेळी पोषण आहार व पौष्टीक खाद्य आदि सुविधा मिळाव्यात व बाल विकास प्रकल्प अधिकारी अकोले, राजूर सक्षम अधिका-यांची नेमणूक करण्यात यावी व एनआरसी केंद्र अकोले येथे होते मात्र एक ते दोन वर्षापासुन एनआरसी मध्ये कुक डायटिशियन , नर्स नाहीत. त्यांचे मानधनही रखडल्याने हे केंद्र बंद पडले आहे ते चालू करण्यात यावे.
अंगणवाडी बालकांसाठी जबाबदारी प्रमुख उद्दिष्ट, पुरक पोषण आहार, अनौपचारिक प्रारंभिक शिक्षण, आरोग्य आणि पोषण मूल्याबाबत सजगता, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संबधित कार्यालयाची सेवांची जबाबदारी, ही या योजनेची सहा प्रमुख उदिष्ट आहेत. या कडे दुर्लक्ष झाल्या मुळे तालुक्यातील बालकांचे कुपोषण वाढले व बालकांचे दुर्धर आजार व इतर आजार मुक्त व्हावे व कुपोषण मुक्त व्हावे.
निवेदनावर ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रूद्रे, कार्याध्यक्ष महेश नवले, ॲड. दिपक शेटे, ॲड.राम भांगरे, माधवराव टिटमे. भाऊसाहेब वाळुंज, प्रा.डॉ. सुनिल शिंदे, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छींद्र चौधरी, गंगाराम धिंदळे, रामदास पवार, राजेंद्र लहामगे, गणपत थिगळे, रामहारी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, प्रमोद मंडलीक, कैलास तळेकर, रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, सखाराम खतोडे, मोहन मुंढे, सुनिल देशमुख, बाळासाहेब बनकर, ज्ञानेश्वर पुंडे, दत्तात्रय ताजणे, कैलास तळेकर, शुभम खर्डे, सुदाम मंडलीक, किरण चौधरी, प्रकाश कोरडे,
आदिंचे नावे आहे. निवेदनाच्या प्रती महिला व बाल विकास मंत्री – आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याण, महिला व बालविकास राज्य मंत्री मेघना बोडीकर, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना पाठविण्यात आल्या आहे.