दारू विक्रेत्याच्या ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या धमक्या, ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन

:
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवगाव येथे राजूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेता देवराम लहानु सामेरे याच्या विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे; मात्र
तरीही तो भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या
धमक्या देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देवगाव ग्रामस्थांनी पुन्हा एकदा राजूर पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे.
दिवसांपूर्वी ग्रामसभेत ठराव करून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राजुर पोलिसांकडे निवेदन देण्यात आले, त्याची तात्काळ दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. देवराम सामेरे याला रंगेहात पकडून त्याच्याकडून ५ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर मुंबई दारुबंदी अधिनियम १२० / २०२५ वर ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. ही कारवाई होऊनही ग्रामस्थांनी आठ ते दहा संबंधित दारू विक्रेता नागरिकांना धमकावत असल्याने
ग्रामस्थांनी पुन्हा राजुर पोलीस स्टेशनला निवेदन दिले. त्यात त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याने गावात दहशत माजवली असून तो कुणालाही जुमानत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर ज्ञानेश्वर भांगरे, सुदाम भांगरे, संजय लांघी, देवराम भांगरे, सदाशिव भांगरे, संकेत सामेरे,
सुभाष सामेरे, राजू आव्हाड, प्रकाश भांगरे यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.