मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर येथे हृदयाची (MICS ) किहोल शस्त्रक्रिया यशस्वी

संगमनेर दि22 -मिनिमल इनव्हेंसिव कर्डियाक सर्जरी (MICS ) हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी एक नवीन तंत्रज्ञान जिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीत मोठी चीर न घेता लहान छिद्रातून शस्त्रक्रिया केली जाते यालाच (MICS ) किंवा किहोल बायपास शस्त्रक्रिया असेही म्हणतात या सर्जरीत हृदयावर कमी ताण पडतो व वेदनाही कमी होतात तसेच हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता टिकून राहते यामुळे पेशंट लवकर बरा होतो किहोल शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याकारणाने पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातच केली जाते परंतु मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर मध्ये किहोल शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर मध्ये डॉक्टर आशिष बाविस्कर,डॉक्टर राहुल गुट्टे ,डॉक्टर संदीप भंगाले ,डॉक्टर स्नेहल गायके आणि मेडिकव्हर टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. याप्रसंगी बोलताना डॉक्टर आशिष बाविस्कर यांनी सांगितलं की MICS किंवा किहोल शस्त्रक्रिया हे नवीन तंत्रज्ञान असून बऱ्याच डॉक्टरांना सुद्धा याबद्दल कमी माहिती आहे या शस्त्रक्रियेमध्ये पेशंट अगदी महिनाभरात पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ शकतो तरी अशी शस्त्रक्रिया आता मेडिकव्हर हॉस्पिटल संगमनेर येथेही होत आहे. डॉक्टर राहुल गुट्टे यांनी सांगितले की अशी शस्त्रक्रिया आता संगमनेर सारख्या ग्रामीण भागातही उपलब्ध असल्यामुळे संगमनेर व परिसरातील लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा.
आज स्वतः पेशंट या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांनी आपले मत व्यक्त करताना हे तीनही डॉक्टर माझ्यासाठी देवदूत आहेत माझ्या छातीमध्ये प्रचंड वेदना होत असताना त्यांनी मला किहोल शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली व ती शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली याबद्दल आभार व्यक्त केले.
मेडिकव्हर हॉस्पिटल चे केंद्रप्रमुख श्री नमन यादव यांनी बोलताना सांगितले की किहोल शस्त्रक्रिया कॅशलेस विमा आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्येही उपलब्ध आहे .या कार्यक्रमास संगमनेर मधील पत्रकार आणि मेडिकव्हर हॉस्पिटल चे मार्केटिंग हेड दिपक जाधव, ऑपरेशन हेड श्री सुजित गायकवाड व मेडिकव्हर हॉस्पिटल चे कर्मचारी उपस्थित होते.