इतर
चास येथील विठाबाई रामभाऊ वाडेकर यांचे वृद्धपकाळाने निधन

कोतुळ /प्रतिनिधी
चास ता. अकोले येथील जुन्या पिढीतील गं. भा. विठाबाई रामभाऊ वाडेकर यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९२ वर्ष होते.
त्या अमृतसगार दूध संघ व हरिश्चंद्र सह पाणीपुरवठा फेडरेशन चे माजी व्हा. चेअरमन कै. रामभाऊ वाडेकर यांच्या पत्नी होत्या. माजी कृषी अधिकारी दत्तात्रय वाडेकर व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाडेकर, रतन रेवगडे, शिला मोरे यांच्या मातोश्री तर अगस्ती साखर कारखान्या चे संचालक कैलासराव शेळके यांच्या मामी होत्या.