इतर

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मैत्रिणीं सोबत गावात राबविली ग्राम स्वच्छता मोहीम!

अकोले प्रतिनिधी

आपले गाव आणि आपली माती याविषयी अत्यंत भावनिक आणि एकरूप असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी बचत गटातील महिलांसह ग्राम स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. स्वच्छतेतून आरोग्य या संकल्पनेला गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात चळवळीचे रूप दिले. हाच विषय पुढे घेऊन जात सालाबाद प्रमाणे गावात भरणाऱ्या काशाई मातेच्या यात्रेनिमित्त ग्राम स्वच्छतेची मोहीम आपल्या बचत गटातील मैत्रिणींना सोबत घेत पद्मश्रींनी हाती घेतली.

देशातील गावरान बियाण्यांची पहिली बीज बँक शेतकऱ्यांसाठी स्थापन करणाऱ्या व जगभर सीड मदर म्हणून लौकिक असणाऱ्या राहीबाई आजही आपल्या गावातील प्रत्येक घटकाशी एकरूप आहेत.

दरवर्षी गावात होणाऱ्या काशाही मातेच्या यात्रेनिमित्त त्या आजही ग्राम स्वच्छतेची मोहीम हाती घेतात. ज्या रस्त्याने ग्रामदेवतेची मिरवणूक जाणार आहे ते सर्व रस्ते त्या आपल्या बचत गटातील महिलांना सोबत घेत दरवर्षी मनापासून साफ करत असतात. त्यांच्या या कृतीतून समाजाने आदर्श घेण्यासारखा आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे , शाळा , मंदिरे व सर्व रस्ते यानिमित्त त्यांनी बचत गटातील महिलांसोबत स्वच्छ केले.प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा जमिनीवर पाय ठेवून आपल्या जन्मभूमीशी प्रामाणिकपणा व एकनिष्ठ पणा कसा जपावा हे त्यांच्या वैयक्तिक कृतीतून दिसून येते. कोंभाळणे या त्यांच्या जन्म गावी ग्रामदेवता काशाई यात्रेनिमित्त सर्वांना स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button