इतर

सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” पुस्तकाचे तृतीय आवृत्ती चे प्रकाशन

पुणे-दि 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त , पुण्यातील शनिवार पेठ भारतीय मजदूर संघ कार्यालय येथील भारतीय श्रमशोध मंडळ येथे राष्ट्रविचारसंपन्न विचारवंत व क्रांतीकारी नेता दत्तोपंत (द. बा.) ठेंगडी लिखित “सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ठुमणे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी किरण मिलगीर (सरचिटणीस, भारतीय मजदूर संघ) यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली.पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीसंदर्भात अधिक माहिती श्री हरी सोवनी यांनी दिली.

या विशेष प्रसंगी मंचावर मा. नाना जाधव, भारतीय मजदूर संघाचे महामंत्री मा. रविंद्र हिमते, विरजेश उपाध्याय, अनिल ढुमणे, आणि किरण मिलगीर मुकुंदराव गोरे, सी. व्ही. राजेश, बाळासाहेब फडणवीस, हरी सोवनी, आणि गीता गोखले हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थितीत होते


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कालखंड व सामाजिक परिस्थिती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कालखंड म्हणजे ब्रिटिशकालीन भारत, जिथे समाज अत्यंत जातिनिष्ठ, विषम आणि अन्यायकारक होता. अस्पृश्यतेचे गंभीर परिणाम दलित व मागासवर्गीय समाजावर पडत होते. शिक्षण, सार्वजनिक सुविधा, धार्मिक स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जात होते. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षण, संघटना आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची दिशा ठरवली. त्यांनी भारतीय समाजाच्या मनामनात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची प्रेरणा दिली.असे मनोगत मा. नाना जाधव, संघचालक रा. स्व. संघ यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.


दत्तोपंत ठेंगडी हे भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, आणि स्वदेशी जागरण मंच यांचे संस्थापक होते. त्यांनी सामाजिक न्याय, स्वदेशी अर्थनीती, आणि कार्यकर्ता घडवणारी संघटनेची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून राष्ट्रहित व सामाजिक समतेचा विचार ठामपणे प्रकटतो.
असे मनोगत विरजेश उपाध्याय, विश्वस्त व प्रमुख वक्ते- भारतीय श्रमशोध मंडळ यांनी व्यक्त केले. त्यांचे हस्ते सदर पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.

संविधान निर्मितीतील आंबेडकरांचे योगदान समाजाच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेली वैचारिक क्रांती समता आणि बंधुतेच्या मूल्यांची भूमिका वैचारिक व सामाजिक अभिसरण कार्यात सक्रिय कार्यकर्ते व समाज धुरीण यांचेसाठी हे पुस्तक पथदर्शी ठरेल असा विश्वास ब्रिजेश उपाध्याय यांनी व्यक्त केला.

हा ग्रंथ नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांच्या कार्याची ओळख करून देणारा व सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो,
असे मनोगत मा. रविंद्र हिमते अखिल भारतीय महामंत्री भारतीय मजदूर संघ यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्य़ा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले, शरद शिंदे यांच्या बुध्द वंदना ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button