महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न

राहुरी,दि १४ महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संघाची राज्यस्तरीय बैठक पंचायत समिती, राहुरी (जिल्हा – अहिल्यानगर) येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला विविध जिल्ह्यांतून आलेल्या लिपिक संवर्गातील प्रतिनिधींचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष,श्री. सुनील मुंगसे ,उपाध्यक्ष श्री. राजेंद्र परदेशी, श्री. रवींद्र पुरोहित
सरचिटणीस श्री. जगदीश कुलकर्णी , संघटक मंत्री
श्री. राधेश्याम कुलकर्णी ,श्री. उदय भावठाणकर (पेन्शनर्स संघ, भारतीय मतदार संघ), महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ उपाध्यक्ष श्री. दिनेश पुसदकर
तसेच . श्री. बलराज मगर (अध्यक्ष व संस्थापक, महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद श्री. सुभाष कराळे , विकास साळुंखे (राज्य समन्वयक), श्री. अभय गट ( अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी), श्री. राजेंद्र मोरगे (कार्याध्यक्ष, लिपिक वर्गीय संघटना, महाराष्ट्र राज्य) आणि श्री. अशोकराव कदम (अध्यक्ष, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना) आदी उपस्थितीत होते

चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे आणि आठव्या वेतन आयोगाआधी वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रितपणे संघटित प्रयत्न करणे . या संदर्भात विविध संघटनांशी यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लिपिक संवर्ग प्रथमच आपल्या हक्काच्या मागणीसाठी एकत्र आलेला पाहायला मिळाला. लिपिकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या विविध संघटनांनीही या विनंतीला मान देत उपस्थिती दर्शवली आणि सामूहिक संघर्षाची भूमिका घेतली.ही सभा लिपिक संवर्गाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी पुढील वाटचालीला नक्कीच बळ देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या कामी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय निम शासकीय लिपिक संघाचे कार्यकारणी व लिपिक सेवक यांनी परिश्रम घेतले
