श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या यात्रा नियोजन बैठकीत विविध उपाययोजना

दत्ता ठुबे
पारनेर – नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठी व राज्यात जागृत , नवसाला पावणारी निघोज येथील श्री मळगंगा मातेच्या यात्रेचे नियोजन बैठकीचे देवस्थान ट्रस्ट ने आयोजीत केलेली बैठक विविध निर्णय घेऊन खेळीमेळीत पार पडली .
या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंतराव कवाद हे होते . यावेळी आरोग्य विभाग , पोलीस खाते , वीज वितरण विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते . यावेळी ग्रामपंचायत , सेवा सहकारी संस्था , शिवबा संघटना व इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधीत विभाग व देवस्थान पदाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली .
या यात्रेसाठी राज्य भरातून लाखो भाविक भक्त श्री मळगंगा मातेच्या दर्शनासाठी निघोज नगरीला भेट देतात . गर्दी व सध्याच्या उन्हाळ्यातील उष्णता यामुळे आलेल्या भाविक भक्तांना कोणताही शारीरिक त्रास होऊ नये , म्हणून येथील आरोग्य विभागाने सुसज्ज औषधे व आरोग्य सेवकांसह तयारी केली आहे .
या यात्रा काळात वीजेमुळे कोणाही भाविक भक्त व ग्रामस्थांना त्रास होऊ नये , म्हणून वीज वितरण कंपनीचे वीज कर्मचारी पुर्ण पणे तयारी त असून गावातील ज्या ज्या विभागातील वीजेचा खोळंबा होईल , तो त्वरीत दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे .
गेल्या २०२४ या वर्षी संपन्न झालेल्या यात्रेत कोणता गैरप्रकार वा चोरी झाली नाही . तद्वतच यंदा ही २० पोलीस कर्मचारी , होम गार्ड यांच्या मदतीने २४ तास यात्रेची सांगता होई पर्यंत डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणार आहे . या वर्षी ही एक ही गैरप्रकार वा चोरी होणार नाही , यादृष्टीने पोलीसांनी नियोजन केले त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी ही प्रयत्नशिल आहेत तर मुख्य बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचारी खास लक्ष देणार आहेत.त्यांना व्यावसायिक ही मदत करणार आहेत.अन्यथा संबंधीत वाहन धारकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागासाठी कुंड मार्गावरील श्री मळगंगा विद्यालयात एस टी बसेस उभ्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून गाव व परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये.
यात्रा श्री क्षेत्र कुंड पर्यटन स्थळावर स्थलांतरीत झाल्यानंतर तेथील वाहनतळ , व्यावसायिकांना जागेचा वा इतर होणारी गैरसोई टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला तर येथे होणारा पहिलवानांसाठी च्या मैदानाची स्वच्छता व कुस्ती शौकिनांसाठीची बसण्याची जागा व्यवस्थित करण्यात आली आहे.येथे होणाऱ्या कुस्त्या प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहणे शक्य होत नाही व पहिलवानांनी योग्य पद्धतीने कुस्ती करावी आणि ती कुस्ती लगेचच कुस्ती शौकिनांना स्क्रिन वर पाहता यावी म्हणून लगेच कॅमेऱ्यात ते क्षणचित्र चित्रबद्ध करून दाखविण्यासाठी एक मैदानावर व एक मैदानाच्या बाहेर अश्या दोन मोठ्या स्क्रिन लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या निघोज गावाला पाणी टंचाई भेडसावू लागली आहे पण यात्रेच्या काळात गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पुष्पावती नदीवरील कपिलेश्वर बंधाऱ्यात दि.१९ रोजी पाणी सोडण्याचा आग्रह आ.काशिनाथ दाते व कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य सुजित झावरे यांनी आग्रह धरल्याने राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने पाणी येणार आहे व पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे .
यात्रा काळात कोणत्याही भाविकाला काही अडचण आल्यास ५ लोकांची दक्षता समिती तयार करण्यात आली असून त्यांचे भ्रमणध्वनी नंबर प्रसिद्ध केले जातील , यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते संबंधीत विभागाला याची माहिती कळवतील तर यात्रोत्सवाला गालबोट लागू नये , सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले तर पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोई सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंतराव कवाद , सचिव शांताराम कळसकर , सहसचिव विश्वास शेटे , कोषाध्यक्ष अमृता रसाळ , संघटक रामदास वरखडे , विश्वस्त व माजी सरपंच ठकाराम लंके , विश्वस्त व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे , विश्वस्त शंकर लामखडे , ॲड. लामखडे , बबनराव ससाणे , रोहिदास लामखडे , आशाताई वरखडे , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन सुनिल वराळ , माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे , ज्येष्ठ नेते ॲड.बाळासाहेब लामखडे श्री. मळगंगा यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके , माजी उपसरपंच उमेश सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते रूपेश ढवण , दिलीप ढवण , भिवाजी रसाळ , राजू काका देशपांडे , ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे , पत्रकार दत्ताजी उनवणे , सुरेश खोसे पाटील , भास्कर कवाद , योगेश खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.