माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांमधून पाणी

लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना निळवंडे चे पाणी देण्यासाठी पाठपुरावा – लोकनेते बाळासाहेब थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी )
मा.महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण पूर्ण केला. त्यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या कालव्यांच्या कामामुळे आज उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी झाले आहेत. याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांना हे पाणी देण्यासाठी आपण पाठपुरावा कायम ठेवणार असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर ,राहता, कोपरगाव, राहुरी व सिन्नर तालुक्यातील एकूण 182 गावांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. उजवा कालवा हा 97 किलोमीटर लांबीचा असून यामध्ये 2 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तर डावा कालवा हा 85 किलोमीटर लांबीचा असून 43 हजार 865 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेले धरणाला लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाटबंधारे मंत्री पदाची 1999 मध्ये शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला सुरुवात झाली. पुनर्वसितांचे प्रश्न मार्गी लावून भिंतीचे काम सुरू होते अनेक अडथळे सुरू असताना पुनर्गस्तांशी चर्चा व समन्वय करून त्यांना संगमनेर व अकोले तालुक्यात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या. भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर डावा व उजव्या कालव्यांचे काम जलद गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला मात्र 2014 ते 19 या काळामध्ये कालव्यांच्या कामाची गती मंदावली होती. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अगदी कोरोना संकटात सुद्धा कालव्यांची कामे सुरू ठेवली गेली.
कोरोनाच्या भयानक संकटांमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले. याचबरोबर शंभर फूट उंचीवर जाऊन कामाची पाहणी ही केली. डावा आणि उजवा कालवा पूर्ण झाला. मे 2023 मध्ये या कालव्यातून प्रथमता पाणी आले. आणि दुष्काळी गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अभूतपूर्व स्वागत या पाण्याचे झाले.
त्यानंतर जुलै 2024 मध्ये सुद्धा डावा व उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी मिळाले. आज उष्णतेची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थिती मध्येही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा राहणार असून यासाठी आपण आराखडा सुद्धा तयार केला होता ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अनेकदा सांगितले आहे. याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उन्हाळ्यामध्ये दोन्ही कालव्यांमधून आलेल्या निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या शेतकऱ्यांनी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निळवंडे चे पाणी आमच्या गावातून येणार हे आम्हाला माहिती होते यासाठी थोरात साहेब काम करत होते. ते कायम शेतकऱ्यांना सांगायचे पाणी देण्यासाठी मी काम करत आहे. आम्हाला डाव्या कालव्यातून तीन वेळेस पाणी आले. त्यामुळे आम्ही भाजीपाल्याचे उत्पादन चांगले घेतले. आज उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतामध्ये पाणी आले आहे. ते फक्त थोरात साहेबांच्या कष्टामुळेच
( सौ.जनाबाई सोनवणे / शेतकरी महिला,वेल्हाळे )
दुष्काळी भागात निळवंडे चे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी डावा व उजवा कालवा पूर्ण केला. कोरोना संकटात त्यांनी सांगितले की दोन्ही कालव्यांचे काम बरोबर करून दोघांनाही बरोबरच पाणी सोडू. सोबत कालवे झाल्याने आमच्या उजव्या कालव्याला सुद्धा डाव्या कालव्या बरोबरच पाणी आले. उन्हाळ्यामध्ये निळवंडे चे पाणी थेट शेतात मिळत असल्याचा आनंद आहे आणि हे सर्व काम थोरात साहेबांचे असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी समृद्धी आणली आहे
( प्रवीण थोरात, शेतकरी पानोडी )