पारनेर तालुक्यात अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची चौकशी करा -अविनाश पवार

दत्ता ठुबे
पारनेर :-जम्मुकाश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून सुपा परिसरात बोगस आधार कार्डच्या आधारे अवैधपणे राहणाऱ्या झोपडपट्टी , भंगार दुकान, औद्योगिक वसाहतीतील अनोळखी नागरिक, बांगलादेशी रोहिंगे किंवा पाकिस्तानी सुद्धा असु शकतात यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे नेते अविनाश पवार यांनी केली आहे
सुपा गावासह परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांची गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात यावे.औद्योगिक वसाहतीसह देशाच्या सुरक्षिततेसाठी सुपा गावांसह वाघुंडे,पळवे,बाबुर्डी,आपधुप, हंगा, रुईछञपती, म्हसणे या गावात मोठ्या संख्येने बोगस आधार कार्डच्या आधारे रहाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे हे वास्तव करणारे नागरिक नेमके कुठले आहेत. हे बांग्लादेशी किंवा पाकिस्तानीसुद्धा असु शकतात या बाबतीत घरे अथवा दुकान भाडे तत्वावर देणाऱ्याने पुर्ण माहिती घेउनच आपली घरे किंवा दुकान भाडे तत्वावर व्यवसाय करण्यासाठी द्यायला हवी पण असे होताना दिसत नाही.
त्यामुळे परिसरातील गावांमध्ये अनोळखी नागरिक मोठ्या संख्येने वावरत आहेत त्यामुळे यांचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. पहलगाम सारखी दुर्दैवी घटना आपल्या इकडे घडु नये यासाठी तात्काळ आठ दिवसांत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांचे पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात यावे असे आदेश ग्रामपंचायतला देण्यात यावे व बोगस कागदपत्रांच्या आधारे झोपडपट्टी तसेच गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच कसल्याही प्रकारची माहिती न घेता घर किंवा दुकान भाडे तत्वावर देणाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करून कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपा पोलिस स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे अविनाश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.