जलसंधारण चळवळ आयुष्यभर चालू ठेवणार – सुजित झावरे पाटील

काताळवेढा गावात पाझर तलाव खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून राज्यात ओळखला जातो परंतु या भागाचे नेतृत्व करत असताना या भागामध्ये जलसंधारणाची चळवळ गेल्या २० वर्षापासून आम्ही राबवत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे मार्गी लागली आहेत.अनेक पाण्याच्या संदर्भातील प्रकल्प उभे राहिले असून या पुढील काळातही पारनेर तालुक्यात जलसंधारणाची चळवळ अविरत चालू ठेवणार असल्याचे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून मृद व जलसंधारण विभाग, अहिल्यानगर आणि संकल्प प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने काताळवेढा, पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील पाझर तलावातील गाळ काढणे व खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. या कामाचा प्रारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच आमदार काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
गावातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून असलेली पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत अवघ्या आठ दिवसांत या समस्येचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पाझर तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तलावातील गाळ काढल्यानंतर पाण्याची उपलब्धता वाढेल ज्यामुळे शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकून जमिनीची सुपीकता वाढवण्यासही हातभार लागणार आहे.
या शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, शिवाजी रोकडे, सरपंच, उपसरपंच खंडूजी भाईक, राहुल गुंड, ठका कडुसकर, सोपान गुंड, संजय गुंड, लहू गुंड, सुदाम गाजरे, अजित भाईक, पोपट गुंड, भाऊ विष्णू गुंड, बाळासाहेब गुंड, आर. वाय. गुंड, शिवाजी डोंगरे, भास्कर महाराज भाईक, महादू भाईक, चंदन पवार, स्वप्नील भाईक, सोमनाथ भाईक, नामदेव ढगे, दिनेश वाघ, म्हतारबा पवार, शुभम सरोदे, दत्तात्रय भाईक, संपत भाईक, शरद पवार, पोपटराव गुंड, सुभाष गुंड, किरण सरोदे, गोविंद गुंड, बाळासाहेब भाईक, रामदास भाईक, विकास गाजरे, संभाजी डोंगरे, रामदास गाजरे, संकल्प फाउंडेशनचे अमोल शिंदे, देवकृपा फाउंडेशनचे प्रसाद झावरे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या योजनांचे महत्त्व अधोरेखित केले.