दुबई येथील साई भक्ता कडून साईबाबांच्या चरणी 24 लाखाचे “ॐ साई चे सुवर्ण दान !

शिर्डी../कविता भराटे
श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात. श्री साईबाबांना दान देणाऱ्या साई भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. श्री साईबाबा ही भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात याचाच प्रत्यय साता समुद्र पलीकडे ही साईबाबांच्या भक्तात वाढ होत आहे.
दिनांक १२ मे २०२५ रोजी दुबई येथील एका साईभक्ताने २७० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील “ॐ साई” हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले. या सुवर्ण दानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.
सदर सुवर्ण “ॐ साई” नाव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे सुपुर्द केल्यानंतर द्वारकामाई येथे बसविण्यात आले. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.