इतर

जीएस महानगर बँक निवडणूक -१८ जागांसाठी ३८ जण रिंगणात, सासू सुना आमने सामने!

गीतांजली शेळके यांच्या पॅनलची एक जागा बिनविरोध

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
जीएस महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या येत्या १ जून रोजी होणार्‍या निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी सुरुवात केली आहे.

१९ जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून गीतांजली शेळके गटाचे संतोष रणदिवे बिनविरोध विजयी झाले.

आता १८  जागांसाठी ३८ जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे एक उमेदवार बिनविरोध झाल्याने गीतांजली शेळके यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीसाठी १९ जागांवर ९६ अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधीपासून बिनविरोध निवडणूक घडवण्यासाठी अनेक बैठका झाल्या परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले.

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सुमनताई शेळके यांच्या गटाचे संचालक श्रीधर कोठावळे यांनी गीतांजली शेळके यांच्या गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. तसेच सुमनताई शेळके गटाचे विकास उंद्रे आणि वर्षा जाधव यांनीही आपले अर्ज मागे घेऊन गीतांजली शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. विजयी सुरुवात करत गीतांजली शेळके यांच्या गटाने उर्वरित १८ जागा जिंकून १९-० अशा फरकाने निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. आता १८ जागांसाठी ३८ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गीतांजली शेळके यांचा दोन मतदारसंघात अर्ज
बँकेचे निवडणुकीत गीतांजली शेळके यांनी सर्वसाधारण मतदारसंघात अर्ज ठेवला असून सोबतीला महिला राखीव मतदारसंघातील त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला आहे याचाच अर्थ दोन मतदारसंघातून त्या आपली उमेदवारी आजमावत आहेत.
“सासू सुना समोरासमोर”-
जीएस महानगर बँक निवडणुकीत सुमनताई शेळके व स्मिता शेळके या मायलेकीची उमेदवारी महिला राखीव मतदारसंघात आहे. त्यांच्या विरोधात गीतांजली शेळके यांनी देखील अर्ज ठेवला आहे.


सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे उमेदवार –
सर्वसाधारण मतदार संघ :  शेळके गीतांजली उदय, कवाद भास्कर बाबाजी, आडसूळ सचिन सीताराम, खोसे कुंदा भास्कर, खणकर सतीश अनंत, थोरात मंगलदास भाऊसाहेब, लंके बबन भाऊ, ढोले रवींद्र दत्तात्रय, पठारे संतोष किसन, शिंदे पांडुरंग विष्णू, गुंजाळ गणेश सावकार, कोठावळे श्रीधर कोंडिराम, खोसे मंगेश नारायण, शिंदे शंकर पांडुरंग. महिला राखीव मतदार संघ : शेळके गीतांजली उदय, वाढवणे छाया रामदास. अनुसूचित जाती/जमाती राखीव मतदार संघ : रणदिवे संतोष भाऊराव (बिनविरोध निवड).  इतर मागास वर्गीय राखीव मतदार संघ : थोरात भिवाजी भागुजी. विमुक्त व भटक्या जाती मतदारसंघ : पालवे विलास दगडू.
सुमनताई शेळके यांच्या पॅनलचे उमेदवार –
सर्वसाधारण मतदारसंघ ः भोसले किसनराव शंकरराव, चत्तर विजय नानाभाऊ, डेरे राजेश चंद्रकांत, ढोमे सुरेश होनाजी, हाडवळे भानुदास ज्ञानदेव, लावंड शिवाजी सदाशिव, पाटील योगेश पांडुरंग, शेळके स्मिता गुलाबराव, तांबे नंदकुमार नाथा, वरखडे बबुशा बाबुराव. महिला राखीव मतदार संघ – शेळके स्मिता गुलाबराव, शेळके सुमन गुलाबराव. इतर मागावर्गीय राखीव मतदार संघ ः कुन्हे मंगेश ज्ञानेश्वर. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ – गर्जे प्रविण कारभारी.
अपक्ष उमेदवार
सर्वसाधारण मतदारसंघ ः भगत विष्णु सखाराम, घावटे राजाराम प्रभू, कावरे बबन राधाकृष्ण, खणकर परशुराम मारुती, राऊत अर्जुन किसन. इतर मागावर्गीय राखीव मतदार संघ ः खोसे खंडू मालक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button