आजचे पंचांग व राशिभविष्य दि १८/०५/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २८ शके १९४७
दिनांक :- १८/०५/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५६,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर ग्रीष्मऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी अहोरात्र,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति १८:५३,
योग :- शुभ समाप्ति ०६:४२, शुक्ल २९:५२,
करण :- गरज समाप्ति १८:०९,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – कृत्तिका,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वृद्धितिथी दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१८ ते ०६:५६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:४१ पर्यंत,
❀ दिन विशेष:
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख २८ शके १९४७
दिनांक = १८/०५/२०२५
वार = भामुवासरे(रविवार)
मेष
आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील.
वृषभ
व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील.
मिथुन
आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये.
कर्क
आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल.
सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा.
कन्या
आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल.
तूळ
आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल.
वृश्चिक
नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील.
धनु
आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल.
मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल.
कुंभ
आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट – कचेरी पासून दूर राहा.
मीन
आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर