राजूर ग्रामपंचायत बरखास्त करा अन्यथा २० मे रोजी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करणारच – सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक

अकोले,ता.१८: राजूर ग्रामपंचायत च्या गैरकारभराची चौकशी करून ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी राजीनामे द्यावेत व ग्रामपंचायत बरखास्त करावी अन्यथा मंगळवारी २०मे रोजी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करणारच असा इशारा शिवसेनेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी राजूर येथील विश्राम ग्रहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे .
राजूर येथे नळाद्वारे आलेल्या अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने सुमारे चारशे रुग्ण कावीळ आजाराने त्रस्त होते त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर रित्या आजारी आहेत तर गोरगरीब कुटुंबातील रुग्ण कावीळ आजाराने रुग्णालयात असून लाखो रुपयांचे मेडिकल बिल त्यांना द्यावे लागत आहे ,अजूनही रुग्ण संख्येत वाढच असून यास जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांना जबाबदार धरून त्यांचेवर कडक कारवाई होणे आवश्यक असून ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे संतोष मुतडक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
ते म्हणाले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांनी राजीनामे दिले पाहिजे ग्रामसेवकांना बडतर्फ केलं पाहिजे काविळीचा आजार पसरवण्यास ग्रामपंचायत कारणीभूत असल्याने व वीस वर्षांच्या प्रियंका शेंडे चा मृत्यू झाल्याने यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
. गेले तीन वर्षापासून राजुर गावात केलेल्या सर्व विकास कामांचा पंचनामा करण्यासाठी एसआयटी स्थापन करून चौकशी करून कारवाई केली पाहिजे फिल्टरेशन प्लांट चालू न ठेवता त्यात टीसीएल व क्लोरीन न टाकल्याने तसेच पाणी डायरेक्ट गावात पिण्यासाठी सोडण्यास कारणीभूत असलेल्या सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे.
पंधराव्या वित्त आयोगातून खरेदी केलेले डस्टबिन 2025 पर्यंत गावात वाटप करण्याच्या ऐवजी ग्रामपंचायत कार्यालयामागे आजही धुळ खात पडलेल्या असून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजे
राजुर गावातील सर्व पेशंट ची यादी तयार करून त्यातल्या गोर गरीब लोकांना ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी दवाखान्याची सर्व रक्कम भरली पाहिजे
. ग्रामसभेत अनेक महत्त्वाचे ठराव होऊन देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी हतबलता व्यक्त करून झालेल्या ठरावांच्या विरोधात जाऊन मनमानी करत ई टेंडरिंग करण्याऐवजी ग्राम पंचायत सदस्यांना फायदा होईल अशी काही कामे काढण्यात आली व त्यांनी ती कामे केली व त्यातून भ्रष्टाचार केला याबाबत चौकशी होऊन कारवाई व्हावी अप्रशिक्षित कामगारां कडून टेक्निकल काम करून घेणाऱ्या ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित केले पाहिजे असे त्यांनी सांगितले
.