सर्पदंशा ने तरुणाचा झोपेत मृत्यू!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे सौरभ बादशहा चौधरी या तरुणाचा झोपेत सर्प दंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली
सामाजीक कार्यकर्ते अजित रावसाहेब चौधरी यांचे पुतणे तसेच बादशाह गणपत चौधरी यांचे चिरंजीव होते
मयत सौरभ बादशहा चौधरी याचे मागे आई वडील पत्नी 8 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे अत्यंत गरीब कुटुंबातील सौरभ च्या अकस्मित दुःखद निधनाने परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे दि.२४/०५/२०२५ रोजी धामणगाव पाट येथे सिद्धेश्वर स्मशानभूमीत त्याचेवर अत्यंसंस्कार करण्यात आले
……तर सौरभ वाचला असता
सौरभ हा आपल्या आई-वडील पत्नीसह एका पडक्या घरात राहत होता अत्यंत गरीब कुटंबा तील या तरुणाने घरकुलासाठी ग्रामपंचायतकडे अनेक वेळा मागणी केली होती परंतु त्याला वेळेत घरकुल मंजूर झाले नाही घरकुल न मिळाल्याने त्याला पावसाळ्याची वातावरणात पडक्या घराच्या निवाऱ्यात राहावे लागत होते पडक्या घरामुळे तो सापाचा बळी ठरला कुटुंबातील एकुलता एक कर्ता माणूस दगावल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित चौधरी यांनी केली आहे
—-/———