निळवंडे चे पाणी शेतात आल्याने चिंचोली गुरवचे नागरिकांत आनंद!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच निळवंडेचे पाणी – इंद्रजीत भाऊ थोरात
तळेगाव दिघे /प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांना व तळेगाव गटातील दुष्काळी गावांना निळवंडे चे पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण केला. त्यांच्या प्रयत्नातून झालेल्या या कालव्यांमधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने एक प्रकारे कार्यसिद्धी झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी सुद्धा माजी मंत्री बाळासाहेब थोरात पाठपुरावा करत असल्याचे प्रतिपादन इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले आहे.
चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरून घेण्यात आले. यावेळी पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सरपंच विलास अण्णा सोनवणे, बाबा ओहोळ, प्रभाकर कांदळकर, नामदेव दादा दिघे,अनिल कांदळकर, राजू गोडगे, विजय गोडगे,सतीश सोनवणे, डॉ.सुहास आभाळे, विनोद गोडगे, विलास मास्तर,सचिन दिघे, योगेश सोनवणे, संदेश गोडगे,अशोक गोडगे, के.डी.सोनवणे, अरुण आभाळे, सोमनाथ आभाळे, भास्कर पानसरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, निळवंडेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रणा देऊन चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी पाईप देऊन पाणी उचलले गेले आहे.

तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले होते मात्र सत्ता बदलली आणि कामात अडथळे निर्माण झाले. तरीही सर्वांना पाणी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पाठपुरावा करत आहेत. राज्यातील सर्व मंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने विकास कामांमध्ये कधीही अडचण येणार नाही. जे शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही त्यांच्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून पुढील काळात काम करण्यात येणार असल्यास ते म्हणाले.
तर संपतराव गोडगे म्हणाले की चिंचोली गुरव मध्ये निळवंडे धरणाचे पाणी आल्याने शेतकरी व नागरिक आनंदी झाला आहे. कारखान्याने खूप मोठी मदत केली जेसीपी पोकलॅण्डसह कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते आणि त्या माध्यमातून अगदी मसोबाच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकण्यात आले आहे.
सरपंच विलास सोनवणे म्हणाले की अशक्य वाटणारे काम माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शक्य करून दाखवले आहे. काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी कायम सातत्याने लोकांनी उभे राहिले पाहिजे तर अविनाश सोनवणे म्हणाले की या भागामध्ये येऊन काही लोक भूलथापा व्हाट्सअप वर खोटी माहिती पसरवतात त्यांना वेळीस रोखा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हौशीराम सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन विलास मास्तर सोनवणे यांनी केले
म्हसोबा बंधाऱ्यात पाणी नेण्यासाठी महेंद्र गोडगे यांचा पाठपुरावा

थोरात कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून चिंचोली गुरव मध्ये चारीद्वारे पाणी नेण्यात आले हे पाणी म्हसोबा बांधाऱ्यात पाईपलाईन द्वारे नेण्याकरता महेंद्र गोडगे यांनी सातत्याने मोठा पाठपुरावा केला हे पाणी मसोबा बांधण्यात आल्याने अशक्य वाटणारे काम झाल्याने नागरिक महिला युवक मोठे आनंदी झाले असून या सर्वांनी पाण्याचे अबूतपूर्व स्वागत केले आहे