पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.आरोटे यांच्याकडून पत्रकार खोसे पाटील यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी गॅस कनेक्शनचे कन्यादान

दत्ता ठुबे
पारनेर – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील व दैनिक जनता आवाजच्या पारनेर तालुका प्रतिनिधी , महिला पत्रकार सौ.निलम खोसे पाटील यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या विवाह प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांच्याकडून नवविवाहित सौ.इशा वैद्य व सागर वैदय दाम्पत्याला गॅस कनेक्शन कन्यादान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष संतोष तांबे, सचिव लतिफ राजे, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड,दत्ता ठुबे,महिला पत्रकार सौ. निलमताई खोसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यात गॅस कनेक्शन कन्यादानाचा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. या उपक्रमाद्वारे सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गॅस कनेक्शनच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याला स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि सुरक्षित इंधन उपलब्ध करून देण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या नवीन जीवनाला एक अर्थपूर्ण सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक कार्यात पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांनी सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. विनोद गायकवाड यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल असे मत व्यक्त केले. संतोष तांबे, लतिफ राजे, दत्ता ठुबे,श्रीनिवास शिंदे आणि भगवान गायकवाड यांनीही नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देत हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे सर यांनी समाधान व्यक्त करत हा उपक्रम राबविल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांचे कौतूक केले तर ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे , संजय मोरे , तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे , जय हरेल , सोमनाथ गोपाळे यांनी ही समाधान व्यक्त केले. दैनिक जनता आवाजच्या पारनेर तालुका प्रतिनिधी सौ.निलम ताई खोसे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा विवाह सोहळा केवळ एक कौटुंबिक समारंभ न राहता सामाजिक जाणीव जागृत करणारा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या उपक्रमामुळे पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी सामाजिक कार्यात आपले योगदान देत एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील यांनी केले आहे.