इतर
पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यास अकोल्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संजय फुलसुंदर

अकोले प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा यंदा १० जून रोजी २६ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे.
निरंतर जनसेवेचा वसा अन् राष्ट्रवादी विचारांची कास धरत महाराष्ट्रभर यशस्वी वाटचाल करत असलेल्या आपल्या पक्षाच्या या आनंद सोहळा मंगळवार, दिनांक १० जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे येथे पार पडत आहे

आमदार डॉ किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात पक्षाचे मोठे संघटन वाढले आहे तरुण पिढी मोठया संख्येने पक्षाला जोडली गेली आहे तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरीव निधी दिला आहे