इतर

महाडीबीटीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात नागरिकांची आर्थिक लूट अवैध सेतू केंद्र बंद करा मनसे नेते अविनाश पवार.

दत्ता ठुबे
पारनेर :-तालुक्यातील जेष्ठ नागरिकांची मोबाईल नंबरला आधार लिंक महाडीबीटी च्या नावाने तहसील कार्यालयात नोंदणी करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिकांची संजय गांधी निराधार अनुदान तसेच श्रावणबाळ योजना अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या जेष्ठ नागरिकांची वयोवृद्ध महिला ची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आहे

आणि या अशिक्षीत नागरिकांचा लिहीता वाचता येत नसल्याने याचाच फायदा पारनेर तालुक्यातील भामट्या एजंटांनी तसेच सेतू सुविधाच्या नावाने पारनेर तालुक्यात गावोगावी सुरू असलेल्या केंद्रात मोबाईलला आधार लिंक करण्यासाठी २००, ३००,५०० रुपये घेऊन लुटले जाते हे सर्व तहसीलदारांच्या आशिर्वादामुळेच तर चालू नाही ना? अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन पारनेर मध्ये जेष्ठ नागरिकांना लुटण्याचा काळा धंदा जोरात चालू आहे.

पारनेर तालुक्यात शासन मान्यता प्राप्त आयडी असलेली सेतू सुविधा केंद्र कार्यरत आहेत की नाही असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.माहीतीची सनद सेतू सुविधा केंद्रात मोठ्या ठळक अक्षरात लावने बंधनकारक असतानाही याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जात नाही आयडी नसताना ही बोगस आधार सुविधा केंद्राच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात खुलेआम मोठ्या प्रमाणावर गोर गरीब शेतकरी बांधवांना तसेच नवीन रेशन कार्ड, नाव समाविष्ट,ऑनलाईनच्या नावाने शाळकरी मुले, मुली, जेष्ठ नागरिकांची विविध प्रकारच्या दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणावर लुट चालू असताना तहसीलदार गप्प का….? तहसील प्रशासनाला वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रव्यवहार करून या गोष्टी लक्षात आणुन सुद्धां कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसेल तर हा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून चाललेला काळा गोरखधंदा राजरोसपणे तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच पुर्ण तालुक्यात तहसीलदार यांच्या आर्थिक मिलीभगत मुळेच सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केला.

अवैधरीत्या सुरू असलेल्या या सेतु सुविधा केंद्रावर तहसीलदार यांनी कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लवकरच जनतेच्या हक्कासाठी जेष्ठ नागरिकांनासोबत घेऊन पारनेर तहसीलदार कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button