इतर
कानपूर येथे झालेल्या नॅशनल कुस्ती स्पर्धेत गणेश मंचरे द्वितीय

पारनेर दि.१५ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील वनकुटे या गावातील दिव्यांग गणेश रावसाहेब मंचरे या विद्यार्थ्यांनी कानपूर येथे झालेल्या गादी विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सराव याच्या माध्यमातून यश संपादन केले आहे.
मंचरे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची असल्याने पुढील स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंचरे यांच्या या यशाबद्दल खा. डॉ. निलेश लंके, निलेश लंके अपंग बहुद्देशीय कल्याणकारी प्रतिष्ठान व आधार दिव्यांग बहुद्देशीय कल्याणकारी ट्रस्ट आणि युथ फॉर जॉब, अनमप्रेम संस्था अहिल्यानगर यांनी अभिनंदन केले आहे.