सेनापती बापट विद्यालयात प्रवेशोत्सवाचा जल्लोष

पारनेर दि.१७ पारनेर प्रतिनिधी
अ. ए. सोसायटीचे सेनापती बापट विद्यालय मध्ये प्राथमिक शाळे मधून आलेल्या नवागताचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी प्राथमिक मधून उत्तीर्ण होऊन माध्यमिक मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात नवागताचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करून सुगंधी फुलांची पाखरण, रांगोळी काढून पताका, आंब्याची तोरणे,फुलांनी सजवलेल्या प्रवेशद्वारा ढोल ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत शैक्षणिक वाटचालीला पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांचे औक्षण शाळेतील महिला शिक्षकांनी केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार (सर) आणि मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकाला गुलाब पुष्प तसेच मिष्ठान्न खाऊ देण्यात आला.यावेळी नवगत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.या नवागताचे उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी स्थानिक समिती सचिव विलास कटारिया, अच्युतराव जगदाळे (सर),प्रभाकर गुळवे ( सर), उत्तर महाराष्ट्र क्रिडारत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनिल गायकवाड ( सर), सुनीता उगले, गणेश गायकवाड, पठारे सर, ठूबे मॅडम, शेळके मॅडम, नरसाळे सर, सुंबे सर, विद्यालयीन कर्मचारी उत्तम पठारे, प्रणव खेडेकर, बाळू बुगे, कदम ताई, काकडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.