इतर

मुंबई, सायन (पुर्व) मधील ज्ञानविकास नाईट हायस्कुल मध्ये नवोगतांचा प्रवेशोत्सव सोहळा!

मुंबई- घरच्या परिस्थितीतून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या होतकरू, मेहनती, श्रमिक वर्ग आणि गृहिणींना मोफत शालेय शिक्षण देण्यापासून उत्कृष्ट करियर मिळवून देण्यापर्यंत कार्यरत असणारी, सलग पाच वर्ष इयत्ता आठवी ते दहावीचा शंभर टक्के रिझल्ट देणारी आणि मेरीट टक्केवारीत नाव टिकवून ठेवनाऱ्या
मुंबई, सायन (पुर्व) मधील जोगळेकर वाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द “ज्ञानविकास नाईट हायस्कुल” यांच्या वतीने दि. १६ जून २०२५ रोजी वर्ष २०२५-२०२६ मधील रात्रशाळेमधील इयत्ता आठवी, नववी आणि दहावी नवोदित विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस म्हणून प्रिन्सिपल परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदांमार्फत “प्रवेशोत्सव नवोगतांचा सोहळा” मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी ज्ञानविकास नाईट हायस्कुल चे प्रिन्सिपल भगवान परदेशी सर, वर्गशिक्षक सुर्यवंशी सर, विषय तज्ञ शिक्षक गणांसह माजी विद्यार्थी व सामाजिक चळवळीतील समाजसेवक जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी रंगीबेरंगी फुगे आणि चित्रांची सजावट केलेल्या शाळेच्या प्रवेशव्दारापाशी गुलाबपुष्प आणि शाळेय वस्तूसह आवश्यक वह्या देऊन स्वागत केले.


शाळेचा वर्ग सुरु करण्याआधी राज्यगीत शिस्तबद्ध पध्दतीने घेण्यात आले.
ज्ञानविकास नाईट हायस्कुलमध्ये प्रवेश घेतलेल्यांपैकी काही परिवाराचा भार सांभाळणाऱ्या गृहिणी तर काही खाजगी नोकऱ्या करणारे व मनपामधील कर्मचारी तर काही कारखान्यामध्ये अंगमेहनतीचे काम करणारे मेहनत करणारे युवा तर काही परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेले तरुण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या सर्व इयत्ता वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या बसवून
“प्रवेशोत्सव नवोगतांचा सोहळा” प्रारंभी वर्ग शिक्षक सुर्यवंशी सरांनी सोहळ्याचे संयोजन करून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सुचित केला.

त्यानंतर नवोदित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांना सुचित केले.
गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक सुचना आणि अभ्यासातून रुची तयार करून यशाचे ध्येयासह आपली ओळख कशी निर्माण करता येईल? यासाठी ज्ञानविकास नाईट हायस्कुलमधून मिळणारे आवश्यक शाळेय वस्तू पासून शिक्षण प्राबल्यासंदर्भात सन्माननीय परदेशी सर, वर्गशिक्षक सुर्यवंशी सर विषयतज्ञ माने सर आणि समाजसेवक जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.


शेवटी प्रिन्सिपल परदेशी सरांनी ज्ञानविकास नाईट हायस्कुलचा सातत्याची यशाची नोंद कायम राखण्याचा प्रण सर्व विद्यार्थ्यांना देऊन सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत राष्ट्रगीताने समारोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button