इतर

अकोल्यात हिरडा तस्करी, १ लाख  ५२ हजार रुपये किमतीचा हिरडा पकडला

  राजूरचे तिघे मुद्देमाला सह ओतूर वनविभागाचे ताब्यात

 अकोले प्रतिनिधी

अकोल्यातुन विनापरवाना १ लाख ५२ हजार रुपायाच्या हिरड्याची वाहतूक.करणाऱ्या टेम्पोसह मयुर लहानु मुतडक (वय-३३), गोरख गणपत लहामगे (वय-४६ ),  किरण सुभाष वराडे (वय-४६ ) सर्व राहणार राजुर, ता. अकोले, जि.अहिल्यानगर या तिघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२.बी), ४२ प्रमाणे ओतूर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे  

 अकोल्यातील आदिवासी भागातील हिराड्याचा  खाजगी व्यक्ती  राजरोस पणे तस्कर्री करत आहे  अकोल्यातील वनविभाग मात्र डोळ्यावर  पट्टी बांधून  याला  आशीर्वाद देत  असल्याचे  आता पुढे आले आहे  हिराड्याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करताना दिसत नाही   खुले आम  हिरडा तस्करीला  वनविभागा चा आशीर्वाद असल्याचा आरोप केला जातं आहे  

, अकोले – जुन्नर सरहद्दीवर ओतुर शिवारात हिरडा मालाची विनापरवाना अवैध वाहतुक करणारा पिकअप क्र. एम एच २६ एच ९१९३ हा पिकअप टेम्पो  ब्राम्हणवाडा रोड येथुन जात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भां.व.से.), सहाय्यक वनसंरक्षक  स्मिता राजहंस,  अमृत शिंदे, यांचे मार्गदर्शना खाली ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्हि. ठोकळ, वनकर्मचा-यांनी ओतूर – ब्राह्मणवाडा रोडवर सापळा लावून तपासणी केली असता सदर टेम्पोत अवैधरित्या हिरडा भरलेला आढळून आला

.या हिरड्यांचे एकूण वजन १६८८ किलो भरले आहे.तर आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या हिरड्याची किंमत १ लाख ५२ हजार इतकी असून वाहतूक करणारे  मयुर लहानु मुतडक (वय-३३)  रा. राजुर, गोरख गणपत लहामगे (वय-४६ ),  किरण सुभाष वराडे (वय-४६ ) रा. राजुर, ता. अकोले, जि.अहिल्यानगर या तिघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२.बी), ४२ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१,३२ व ८२ अन्वये वनपरिमडंळ ओतूर राउंड गुन्हा क्र.ओ-३/२०२५ नोंद करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याबाबत तपास ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button