पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणी

पारनेर प्रतिनिधी :-
स्थानिक युवकांना डावलून सुमारे १०० ते १५० परप्रांतीय लोकांकडून बाजार समिती मध्ये काम करवून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या परप्रांतीय कामगारांना त्वरित हटवण्यात येऊन स्थानिक तरुणाची भरती करावी या बाबत माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार व रमेश साबळे यांनी आक्रमक पवित्रा घेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना लेखी निवेदन दिले आहे.
पारनेर बाजार समितीमध्ये स्थानिक युवकांना डावलून परप्रांतीय लोकांकडून असंवैधानिकपणे हमालीची कामे करून घेतली जात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन होत आहे तसेच हे परप्रांतीय कामगार बाजार समितीमध्येच रहात असल्याचे निदर्शनास आले. कामगार सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही त्यामुळे बाजार समितीमध्ये माथाडी कामगार कायद्याप्रमाणे हमाल भरती करून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच माथाडी कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क व सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही असे होत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या निदर्शनास आले आहे
.याबाबतीत गांभीर्याने घेत बाजार समितीने लिखित स्वरूपात खुलासा करुन जर १५ दिवसात परप्रांतीय कामगार लोकांना हटवून स्थानिक बेरोजगार युवकांना भरती करून घेतले नाही आणि व्यापारी कापत असलेला कडता बंद केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने पारनेर बाजार समितीमध्ये बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.
~ गेल्या कित्येक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०० ते १५० परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत बाजार समिती कडे त्यांचे आधारकार्ड किंवा ओळख पत्र उपलब्ध नाहीत त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकसुद्धा येथे वास्तव्यास असु शकतात पोलिस प्रशासनाने याबाबत कारवाई करुन परप्रांतीयांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून पारनेरकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर दखल घेणे महत्वाचे आहे.
मनसे नेते-अविनाश मुरलीधर पवार.