इतर

जागतिक योग दिनीं अकोल्यात जेलमधील कैद्यांना दिले योगाचे प्रशिक्षण

      अकोले प्रतिनिधी

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आजजिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर अकोले श्री धीरज हिंग्लजकर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले सबजेल मध्ये सर्व कैद्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.

याप्रसंगी योग प्रशिक्षक, अधिकार मित्र दत्तात्रय शेणकर ,ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष तथा अधिकार मित्र मच्छिंद्र मंडलिक, अकोले सबजेलचे तुरुंग अधिकारी किसन लोहरे इत्यादी हजर होते.

या आंतरराष्ट्रीय योगदीनी, कैद्यांना योगाचे महत्त्व व योगामुळे आपल्या शरीरावर व मनावर होणारे परिणाम समजून सांगण्यात आले. सदर योग प्रशिक्षणामुळे कैद्यांनी आम्हाला आठवड्यातून एकदा योग प्रशिक्षण शिबिर घेण्याची इच्छा व्यक्त केली व सर्व कैदी उत्साही झाल्याचे वातावरण दिसले. कैद्यांच्या या सूचनेचा विचार भविष्यात करू असे जेल अधिकाऱ्यांनी व जेलरक्षकांनी कैद्यांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button