संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांचा ग्राहक पंचायत च्या वतीने सत्कार !

संगमनेर – संगमनेर येथे प्रांताधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले अरुण उंडे साहेब यांचा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेरच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे यांनी अरुण उंडे यांचे स्वागत केले व त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले , ” संगमनेर तालुक्यातील ग्राहकांच्या समस्या अनेक आहेत , आम्ही ग्राहक पंचायत संगमनेर च्या वतीने अनेक तक्रारींचे निवारण केले आहे.
यापुढेही ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास ग्राहक पंचायत यांचेशी संपर्क साधावा ” यावेळी नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि ते म्हणाले , ” आम्ही ग्राहक पंचायत यांच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यास वेळोवेळी सहकार्य करू “
यावेळी ग्राहक पंचायतीचे संगमनेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे , सचिव अडव्होकेट सुभाष गोडगे, प्रसिद्धी प्रमुख व प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, योगतज्ञ डॉ.सुधाकर पेटकर , बाळकृष्ण महाजन , प्रजासत्ताक न्यूजचे सलीमभाई शेख यासह ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते उपस्थित होते.