नेप्तीत मोहरम निमित्त धार्मीक एकतेचे दर्शन

मोहरम बंधूभावाचा संदेश देतो. :सरपंच संजय जपकर
अहिल्यानगर/प्रतिनिधी :
नगर तालुक्यातील नेप्ती येथे मोहरमनिमित्त गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन धार्मिक एकतेचे दर्शन घडवले. मौलाना मुनीर सय्यद , हुसेन सय्यद व साजिद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सवाऱ्यांची स्थापना केली .
स्थापनेच्या परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला .यावेळी हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होते. गावातील धार्मिक वातावरण मोहरमय झाले होते.
मोहरम निमित्त गावात इमाने हसन-हुसेन यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देणाऱ्या मजलीसचे आयोजन केले होते. मजलीसनंतर भाविकांमध्ये प्रसादचे वाटप करण्यात आले. सरपंच संजय जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले व प्रा. एकनाथ होले यांच्या हस्ते सवाऱ्यावर चादर अर्पण करून गावाच्या सुख शांती व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
भारतामध्ये विविध धर्म -पंत- जात असून मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे . मोहरम जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून मोहरम जगात बंधुभावाचा संदेश देतो असल्याचे प्रतिपादन सरपंच संजय जपकर यांनी केले.

यावेळी माजी उपसरपंच फारूक सय्यद, माजी उपसरपंच संजय जपकर ,मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंतराव पवार ,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले ,प्रा.एकनाथ होले, मौलाना मुनीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य दादु चौगुले, बंडू जपकर,प्रा.बाबुलाल सय्यद, हुसेन सय्यद ,सादिक पवार ,गुलाब सय्यद, नितीन पवार, बबन सय्यद, जावेद सय्यद, अतुल जपकर ,जमीर सय्यद, मुनीर सय्यद, मेहबूब सय्यद, सादिक सय्यद, वाजीद सय्यद, मुक्तार सय्यद ,नौशाद शेख , सिकंदर शेख, सलीम सय्यद, युनूस सय्यद ,हन्सार सय्यद, कयूम सय्यद, उमर सय्यद ,नावेद सय्यद रमिज सय्यद ,आदिल सय्यद, परवेज सय्यद, बादशाह सय्यद, रफिक सय्यद, मोईन सय्यद ,आसिफ सय्यद, आसिफ शेख, एजाज सय्यद, हमीद सय्यद, नसीर सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.