मुंबई येथील अमास सेवा ग्रुप व रसलियारा ग्रुप तर्फे खिरविरे बिटात ३७९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

.
अकोले/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील केंद्रातील १४ शाळेतील ३७९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.

अमास सेवा ग्रुपचे चंद्रकांत भाई व रसलियारा ग्रुप ककरवा मुंबईचे अध्यक्ष,सचिव, त्यांचे सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने ३७९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
स्कूल बॅग,वही,पेन,पेन्सिल,पाटी,लेखणीचे बॉक्स,कंपास,पाणी बॉटल,ब्लेझर व खाऊ म्हणून सोनपापडी वाटप करण्यात आले.रुपये ३.७५.००० किंमतीचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी दोन्ही ग्रुपला शाळेकडून सन्मानपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात लेझीम पथक,आषाढी वारीचे आयोजन केले त्यात टिपरी नृत्य,देशभक्ती गीतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.केंद्रातील खिरविरे,तिर्थाचीवाडी,कारवाडी,चोमदेववाडी, धारवाडी,गवळीबाबावाडी,मानमोडी,चंदगिरवाडी,कारवाडी,बिताका आणि इदेवाडी,ठोकळवाडी,पिंपरकणे,म्हसोबावाडी,या शाळांचा समावेश होता.
यावेळी उपस्थित खिरविरे बिटाचे शिक्षण विस्तारधिकारी एकनाथ भांगरे,खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय भांगरे,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक कैलास सारुक्ते,जिल्हा परिषद अहिल्यानगर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक नरेंद्र राठोड तसेच सर्व शाळेतील शिक्षक शिक्षीका,सरपंच,सदस्य,पोलीस पाटील,पालक वर्ग सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.केंद्रातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी सर्वांचे आभार मानले.