सेनापती बापट विद्यालयाच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांची विद्यालयास सदिच्छा भेट

पारनेर.. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट विद्यालय पारनेर येथे विद्यालयाचे प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी शनिवार दि.१२ रोजी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी विद्यालयाने गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने विद्यालयाची प्रशंसा केली.
तसेच विद्यालयास भेट दिल्याने विद्यालयाचे शाळा समिती सदस्य व खादी ग्रामोद्यकचे संचालक अमित जाधव यांनी विशेष प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांचा विशेष सन्मान केला.
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश. नुकतीच जाहीर झालेले माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत कु. आरोही भूषण बोरुडे या विद्यार्थिनीने जिल्हा गुणवत्ता यादीत विशेष यश संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवलाआणि विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा अबाधित ठेवली.
यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक आर व्हि.कासार ( सर) शिक्षक नरसाळे एस. टी. सुंबे आर.बी, काकडे डी.एस, माळशिकारे एच .के. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह, सन्मा. छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह सन्मा. गौरवजी फिरोदिया, खजिनदार सन्मा. प्रकाशजी गांधी, सल्लागार मंडळ सदस्य सन्मा. भूषणजी भंडारी, शाळा समिती चेअरमन सन्मा. अनिलशेठ भंडारी, कोचेअरमन विलास कटारिया, प्रभाकर गुळवे,डॉ. किशोर कुमार पुरकर, अमित जाधव, ज्ञानेश्वर सातपुते, भिकाजी जगदाळे, अरुण बढे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कासार आर.व्ही यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.