तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदय विद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व.

अकोले /प्रतिनिधी –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांचे वतिने आयोजीत तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांत राजूर येथील सत्यनिकेत संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा तालुक्यात दबदबा असून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. वय वर्षे १४,१७ व १९ या तिनही मुलांच्या व मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळविला असून, सदर संघांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.
यावेळी पंच म्हणून तालुका क्रीडा समितिचे अध्यक्ष प्रा.योगेश उगले,आकाश शिंदे यांनी काम पाहीले.या खेळाडूंना क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे व विनोद तारू यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

तालुकास्तरावर खेळाडूंचा अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,माजी शिवसेना शहरप्रमुख गणेश कानवडे,चिंतामणी उदयोग समुहाचे संचालक चैतन्य कदम,प्रा.योगेश उगले आदीं मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रेणादायी यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या नेत्रदीपक कामगिरीमुळे यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल.मुठे,माजी सचिव टी.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक प्रकाश टाकळकर,मिलिंदशेठ उमराणी,विजय पवार,एस.टी.येलमामे,अशोक मिस्त्री,श्रीराम पन्हाळे,शिक्षण निरीक्षक लहानू पर्बत,माजी प्राचार्य विलास नवले,मनोहर लेंडे,प्रकाश महाले,विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे, मुख्याध्यापक संपत धुमाळ,मधुकर मोखरे,अधिक्षक मच्छिंद्र ढगे,जयराम काठे, श्रद्धा जोशी,गोरख माळी,धोंगडे ताई यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.




