इतर

रविवारी अकोल्यात समता परीषदेच्या बैठकीचे आयोजन!

अकोले प्रतिनिधी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दि. 14 सप्टेबर रोजी प्रा बाळासाहेब मेहत्रे यांच्या निवासस्थानी अकोले (जिल्हा आहिल्यानगर). येथे आयोजित केली आहे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसींना न्याय देण्याचे कार्य भारतभर सुरू करण्याच्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाभर या प्रमाणे बैठका घेण्यात येत आहे.

या बैठकीस समता परीषदेचे प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर, समता परीषदेचे जेष्ठ नेते माजी आमदार पांडूरंग अभंग, जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश कार्यकारीणी सदस्य पद्मकांत कुदळे, विभागीय अध्यक्ष मच्छींद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष अंकुशराव ताजणे आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहे.

या बैठकीत तालुकावार कार्याचा आढावा घेवून त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे.यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्तीचे संचालक बाळासाहेब ताजणे, जिल्हा परिषद मा सदस्य बाजीराव दराडे, मा. नगरसेवक नवनाथ गायकवाड, प्रमोद मंडलिक,भाऊसाहेब मंडलिक प्रा. बाळासाहेब मेहत्रे, किशोर झोडगे, मनोज गायकवाड, राजेंद्र उकिरडे, अशोक गायकवाड, वसंतराव बाळसराफ, रामनाथ शिंदे, भास्कर मंडलिक, श्रीनिवास रेणुकादास, नवनाथ पांडे, अशोक पांडे, सचिन ताजणे, सुनील गिते ,अशोक ताजणे,,शिवाजी गायकवाड सचिन गिते आदींनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button