रंधा येथील घोरपडा देवी मंदिरातील दानपेटी फोडली संशयास्पद चोरीचा तपास तात्काळ करा –

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रंधा धबधबा येथील श्री क्षेत्र घोरपडा देवी मंदिरातील दानपेटी 5 ते 6 दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने कट्टरने कापून फोडली आहे या दान पेटीत असलेली अंदाजे दोन लाख रुपये इतकी रक्कम चोरी गेल्याचा अंदाज आहे चोरी झाल्यानंतर दानपेटीला पुन्हा दोन तीन दिवसांनी वेल्डिंग करून पूर्वीप्रमाणे असल्याचा भास निर्माण करण्यात आला आहे,यामुळे हे प्रकरण अधिक संशयास्पद वाटत आहे.

घोरपडा देवी देवस्थानात दररोज भाविक, पर्यटक आणि आदिवासी समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेने दानपेटीत सुवर्णं वस्तू व रोख रक्कमेचे दान टाकतात. मंदिराचे व्यवस्थापन घोरपडा देवी ट्रस्ट यांच्या
मार्फत चालते. या घटनेमुळे भाविकांमध्ये व स्थानिक समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी,अशी मागणी करण्यात आली आहे आमदार डॉ किरण लहामटे राजूर चे पोलीस निरीक्षक श्री पवार यांना दिले आहे
येत्या 10 दिवसांत या चोरीतील आरोपींना अटक करावी अन्यथा स्थानिक नागरिक, भाविक आणि समाज बांधवांच्या वतीने आम्हाला पोलीस स्टेशनसमोर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार, सामाजिक कार्यकर्ते मंगळा पटेकर ,विठ्ठल पोरे,पुनाजी मांडे, राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे


