अकोल्यातील डॉ. एम.के. भांडकोळी यांना मातृशोक

अकोले प्रतिनिधी
अकोले शहरातील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक व भांडकोळी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. मारुती भांडकोळी यांच्या मातोश्री व डॉ. ज्योती भांडकोळी यांच्या
सासूबाई सुंदराबाई कावजी भांडकोळी (वय 80) यांचे बुधवारी( दि 3) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर घोटी-शेळवंडी (ता अकोले) अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदिवासी भागातील घोटी शीळवंडी येथील सुंदराबाई कावजी भांडकोळी यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला उभारी दिली संघर्षमय आयुष्य जगत आर्थिक अडचणी आणि ग्रामीण, अतिदुर्गम भागातील शिक्षणाच्या मर्यादा असूनही त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलांच्या आयुष्याला दिशा दिली.
त्यांच्या कष्टाचं, संस्कारांचं फलित म्हणून तालुक्यातील आदिवासी समाजाचे पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर झालेल्या डॉ.मारुती भांडकोळी यांनी अकोल्यात आरोग्य सेवेत मोठे योगदान दिले. त्यांनी शेकडो रुग्णांना
जीवनदान दिले
कै सुंदराबाई भांडकोळी यांच्या पश्यात डॉ एम के भांडकोळी शिक्षक श्री रंगनाथ भांडकोळी श्री. महादू भांडकोळी असे तीन मुले मुलगी सौ. ताईबाई पडवळे यासह सुना नातवंडे असा परिवार आहे


