अकोल्याचे सुपुत्र डॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांचा नेपाळ मध्ये होणार सन्मान!

एस. के. जाधव /प्रतिनिधी
कोकणवाडी दि.५ दक्षिण आशियाई प्रादेशिक नेपाळ देश ब्रिलियन्स (SARC) विशेष पुरस्कार 2025 व स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शांतता अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने नेपाळ या देशाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे काटमांडू येथे आयोजन केले आहे.
या पुरस्कार सोहळ्याकरीता भारतातून उल्लेखनीय कार्य व आपल्या कार्यावर प्रभुत्व असलेल्या हुशार,अनुभवी, व उल्लेखनीय समाजकार्य केलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील ता.अकोले मौजे पोपेरेवाडी (कोंभाळणे) या गावचे सुपुत्र डॉ.व्ही.व्ही.पोपेरे यांचा समावेश आहे
डॉ पोपरे यांचे समाजसेवा व साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य आहे . निती आयोग भारत सरकार यांच्या विविध पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत तसेच भारतामधील विविध राज्यातुन त्यांना पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदिवासी सेवक या पुरस्काराने सन्मानित असलेले आहे जम्मू काश्मीर सरकार यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी मिळाली आहे
डॉ.व्ही व्ही पोपेरे यांची पुरस्कारा करीता निवड झालेली आहे. ही बाब खूप अभिनंदनस्पद असून डॉ.पोपेरे यांचे विविध स्तरातून नातेवाईक मित्र परिवार व कळमजाई माता तरुण मित्र मंडळ पोपेरेवाडी,कळमजाई माता महिला बचत गट पोपेरेवाडी,तसेच कोकणवाडी ग्रामपंचायत सरपंच कौतुक करत अभिनंदन केले आहे
.या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे मा.महामंहीम. पंतप्रधान नेपाळ देश,व प्रमुख मंत्री महोदय नेपाळ इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा 29 डिसेंबर 2025 रोजी काठमांडू नेपाळ येथे संपन्न होणार आहे. डॉ. पोपेरे यांचे
नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी अभिनंदन केले आहे



