रणद बुद्रुक (ता. अकोले) येथे शेतकऱ्यांना बटाटा लागवड प्रशिक्षण

एस के जाधव/प्रतिनिधी
कोकणवाडी दि. ५ डिसेंबर २०२५ — ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचालित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत रणद बुद्रुक ता अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे बटाटा लागवड विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना बटाटा बियाणे(कुफरी पुखराज) देण्यात आले. तसेच बियाण्याच्या प्रक्रियेसाठी बाविस्टीन बुरशीनाशक, प्रोफेक्स कीटकनाशक, ह्यूमीग्रीन, M-45 आदींचा समावेश असलेले किट ४५ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.
बायफचे श्री. राम कोतवाल, श्री. निलेश आलवने व श्री. विष्णू चोखंडे यांनी प्रशिक्षणा दरम्यान बटाटा वाणाची निवड, जमिनीची तयारी, पेरणीची योग्य वेळ, खत व पाणी व्यवस्थापन, रोग–कीड नियंत्रण, तणनियंत्रण, तसेच काढणीपर्यंतच्या संपूर्ण शेती पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले सर्व उपस्थित सर्व शेतकऱ्यांना बटाटा लागवड विषयी माहिती पत्रक देण्यात आले.
रणद खुर्द, रणद बुद्रुक आणि वाकी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर तसेच बायफचे श्री. प्रदीप खोसे आणि श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजनात बायफचे श्री. मारुती सगभोर आणि कु. काजल देशमुख तसेच मोठादेव ग्राम विकास समितीचे अध्यक्ष, सचिव, सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी ए.एस.के फाउंडेशनचे मॅनेजर अरुण बांबळे, सरपंच श्री. सुंदरलाल भोईर, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष श्री. मधुकर पटेकर तसेच समिती सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




