भंडारदरा येथेनेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारदरा (ता. अकोले), 8 डिसेंबर 2025 —
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अकोले आणि दर्शन रोटरी क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने भंडारदरा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरादरम्यान बायफचे श्री. राम कोतवाल, श्री. विष्णु चोखंडे, श्री. निलेश आलवणे, दर्शन रोटरी क्लबचे डॉक्टर रोहित शिंदे, श्री. संदीप घुले, सिकंदर पठाण तसेच गावच्या सरपंच सौ. अनिता खाडे, उपसरपंच गंगाराम इदे आणि ग्रामविकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात एकूण 63 महिला व पुरुषांनी नेत्र तपासणी करून घेतली. तपासणीत 14 जणांना मोतीबिंदूचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यापैकी 13 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दर्शन रोटरी क्लब, संगमनेर येथे दाखल करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर , अरुण बांबळे तसेच बायफचे श्री. प्रदीप खोसे आणि श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्रचिती राया ग्रामविकास समिती, भंडारदरा व बायफचे श्री. मारुती सगभोर आणि काजल देशमुख यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.


