इतर

नाशिक ला मुक्त विद्यापीठात माजी विद्यार्थी संघातर्फे रक्तदान शिबिर 

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यी संघाच्या वतीने कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ७० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. 

कृषिविज्ञान केंद्राचे संस्थापक कार्यक्रम समन्वयक प्रा. का. य. सोनवणे यांचे स्मृतीपित्यर्थ गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्र. कुलगुरू प्रा. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्याहस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी कृषिविज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, माजी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस डॉ. संतोष साबळे, डॉ. श्याम पाटील, हेमराज राजपूत, राजाराम पाटील, जनकल्याण रक्तकेंद्राचे अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

कृषिविज्ञान केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या कृषि शिक्षण केंद्रातील विद्यार्थी, केंद्रातील शास्त्रज्ञ व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले. सुमारे ७० बाटल्यांचे संकलन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. आजवर जवळपास एक हजाराहून अधिक बाटल्यांचे संकलन या विभागामार्फत करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक बांधिलकेतून सुरु असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री डॉ. गिरीधर माने, प्रदीप देशमुख, जिग्नेश चौधरी, उमेश गाधले, वैष्णवी जाधव, अर्चना पवार, संदीप दळवी आदींचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button