NMMS परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे उल्लेखनीय यश

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोतुळ ता. अकोले जि. अहिल्यानगर या शाळेतील इयत्ता ८ वी च्या वर्गातील 21 विद्यार्थ्यांनी NMMS (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशामुळे विद्यालयाचा अकोले तालुक्यात विद्यालयाने अव्वल स्थान पटकावले आहे.

या परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले आहे . विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळवले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.चंद्रकांत दळवी,सचिव श्री. विकास देशमुख उत्तर विभागाचे चेअरमन आमदार श्री.आशुतोष दादा काळे तसेच रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. बोडखे एन. सी. सहाय्यक विभागीय अधिकारी मा. श्री. बाबासाहेब नाईकवाडी , सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. प्रमोद तोरणे , रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे जनरल बॉडी सदस्य श्री. मनोज भाऊ कवडे ,स्थानिक स्कुल कमिटी, सल्लागार समिती, माजी विद्यार्थी संघ,शाळा व्यवस्थापन समिती,पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे
विद्यालयातीचे प्राचार्य श्री. देशमुख बी. के. पर्यवेक्षक श्री. गोडे जे. बी. विभाग प्रमुख श्री.सारोक्ते ए. एस. विषय शिक्षक श्री. पंडित पी. डी.श्री.गोरडे एस. पी. श्री. कोकतरे एच. एल यांनी विशेष मार्गदर्शन केले.



