इतर

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले बोटा येथील पावडे परिवाराचे सांत्वन!

संजय उकिरडे/ महादर्पण प्रतिनिधी


​बोटा (संगमनेर): संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.लक्ष्मण नन्हुजी पावडे (गुरुजी) यांच्या निधनानंतर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्री.भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पावडे परिवाराचे सांत्वन केले.


​ दिल्ली येथील महत्त्वाच्या शासकीय कामांमुळे खासदार वाकचौरे दशक्रिया विधीला उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र, दिल्लीहून परतताच त्यांनी गुरुजींच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत थेट बोटा येथे धाव घेतली. यावेळी त्यांनी दिवंगत गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
​”गुरुजींचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून, त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांत खासदार वाकचौरे यांनी आपल्या भावना व्यक्तकेल्या.


​याप्रसंगी श्री. रामभाऊ बापू शेळके (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, बोटा) श्री. अरुण दादा वाकचौरे, श्री. अलीभाई तांबोळी, श्री. एकनाथ सावळीराम शेळके. श्री. सुरेश जाधव, श्री. रमेश वाकचौरे, श्री. लतीफ तांबोळी. सौ. नंदाबाई वाकचौरे, श्रीमती. हिराबाई जाधव, तांबोळी भाभी, शेख भाभी. श्रीमती. चंद्रकला विधाटे, सौ. जया केदारी, सौ. दलिता माने.आदी उपस्थित होते
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि महिलांनी दिवंगत गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button