महामार्गावर लक्झरी गाडी जळून खाक!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
: अहमदनगर ते विशाखापटनम एन एच 61 रोडवरती पाथर्डी खरवंडी रोडवरील शेकटे फाटा येथे रात्रीच्या सुमारास एक लक्झरी गाडी जळून भस्मसात झाली असून या गाडीचा कसल्याही प्रकारचा पार्ट शिल्लक राहिला नसून अत्यंत भयानक पद्धतीने लक्झरी गाडी जळून खाक झाली आहे तरीपण गाडीमध्ये आग लागलेली कळताच चालक ड्रायव्हर ने गाडी साईडला ओढली व त्यानंतर त्या गाडीमधील प्रवासी यांनी इमर्जन्सी दरवाजा उघडून व काचा तोडून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला तरी या लक्झरी गाडीमध्ये अंदाजे 25 ते 30 प्रवासी प्रवास करत असतील असा अंदाज वर्तवला जात आहे यामध्ये कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून काही प्रवाशांना थोड्याफार प्रमाणात या आगीचे फटका रे बसले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून ही लक्झरी गाडी मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे सांगण्यात आले.गाडी जळून भस्मसात झाल्याने या गाडीची कसल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.