इतर

भारतीय मजदूर संघ कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी!



पुणे, दि. १४ एप्रिल — भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालयात आज भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष मा. सचिन मेंगाळे, प्रदेश संघटन मंत्री मा. बाळासाहेब भुजबळ, भामसंघाचे ज्येष्ठ नेते मा. सुभाष सावजी, विभाग प्रमुख मा. उमेश विश्वाद, तसेच केंद्रीय कार्यसमिती सदस्य श्री. रविंद्र देशपांडे, श्री. विजय पाटील, श्रीमती मनीषा डोईफोडे, श्रीमती बेबीराणी डे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी श्री. रविंद्र देशपांडे यांनी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी व पुजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसंबंधांना उजाळा देत सामाजिक अभिसरण, समाजजागृती व समाजोत्थानाच्या कार्याचे प्रभावी उदाहरणांसह विवेचन केले. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले कार्यक्रमाचे समारोप पुष्पांजली अर्पण करून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button