इतर

संगमनेर रोटरी क्लबचे कार्य गौरवास्पद – गव्हर्नर रो.सुधीर लातुरे.

प्रा.डॉ.बायसा गुंजाळ यांना “रोटरी सक्षम पुरस्कार” आणि डॉ.प्रवीण घुले यांचा “रोटरी आत्मनिर्भर पुरस्कारा”ने गौरव.

संगमनेर (प्रतिनिधी)
समाजातील अनेक महनीय व्यक्तींपासून नेहमीच प्रेरणा मिळत असते. पूर्वीची परिस्थिती वेगळी व आत्ताची वेगळी आहे. आयुष्यात कुठेतरी शॉट कट घ्यावा लागतो. समाजाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणी पायदळी तुडवत घेतलेला विचार, कृती, समाजाला अभिप्रेत जीवन जगण्यास उद्युक्त करत असते.पुरस्कारांसाठी सुयोग्य व्यक्ती शोधण्यासाठी अडचणी येतात .मात्र संगमनेर रोटरी क्लबच्या माध्यमातून सुयोग्य व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी केली ती सार्थ आहे. समाजासाठी पथदर्शक स्वरूपाची आहे.असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3232 चे प्रांतपाल रो. सुधीर लातूरे यांनी केले .’स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे कार्य गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील मालपाणी हेल्थ क्लब च्या सभागृहात आयोजित रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘रोटरी सक्षम ’ व ‘ रोटरी आत्मनिर्भर’ पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गव्हर्नर रो.सुधीर लातूरे बोलत होते. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या फर्स्टलेडी सौ.संगीताताई लातुरे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.डॉ. राजगोपाल तापडिया, असिस्टंट गव्हर्नर रो.अमोल वैद्य , संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विश्वनाथ मालाणी, सचिव रो.सौरभ म्हाळस हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.बाईसा गुंजाळ यांना ‘रोटरी सक्षम पुरस्कार’
तर नांदूर खंदरमाळ येथील डॉ. प्रवीण घुले यांना ‘रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलतांना गव्हर्नर रो. लातूरे म्हणाले की, प्रा.बाईसा गुंजाळ यांनी दिव्यांगत्वावर मात करून प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेत विद्यार्थ्यांना केलेले ज्ञानदान हे प्रेरणादायी असल्याचे म्हंटले .
तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्याचे डॉ. प्रवीण घुले यांचे
कार्य तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी पुरस्कार प्राप्त डॉ.बाईसा गुंजाळ व डॉ. प्रवीण घुले यांनी या पुरस्कार मुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब च्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

प्रास्ताविक व स्वागत संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विश्वनाथ मालाणी यांनी केले. क्लबच्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचा आढावा क्लबचे सचिव रो.सौरभ म्हाळस यांनी घेतला.

प्रमुख अतिथी रो.लातूरे यांचा परिचय रो.अजित काकडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. भारतभूषण नावंदर व रो.सुनील घुले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो.डॉ किशोर पोखरकर, रो. विकास लावरे, रो.राजेंद्र खोसे, रो. सुनील घुले ,रो.आनंद हासे,रो.डॉ.प्रमोद राजूस्कर, रो.अजित काकडे, रो.समीर शहा,रो.पवनकुमार वर्मा, रो.संकेत काजळे, रो.नरेंद्र चांडक, रो.महेश वाकचौरे,रो.योगेश गाडे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी क्लबचे सर्व संचालक मंडळ, सदस्य व त्यांचे कुटुंबीय आणि पुरस्कारार्थींचे नातेवाईक उपस्थित होते.

– संगमनेर क्लबचे पदाधिकारी, संचालक मंडळाशी
रोटरीचे गव्हर्नर रो.सुधीर लातूरे यांनी मनमोकळा संवाद साधत आगामी ध्येयधोरणांवर चर्चा केली. संगमनेर रोटरी क्लबकडून आय केअर हॉस्पिटल हा दिशादर्शक प्रकल्प गेल्या अनेक वर्षांवरून रुग्णांची माफक दरात उच्चतम सेवा करत आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पुनर्वसन, दिव्यांग समावेशक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्प तसेच डिजिटल शिक्षणाचा प्रसार अशा अनेक क्षेत्रांत सातत्याने संगमनेर रोटरी क्लबचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button